shehzada

कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) काळा चश्मा आणि निळ्या रंगाचा शर्ट या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. ‘शहजादा’ चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर या चित्रपटाचे निर्माते 12 जानेवारी 2023 ला ट्रेलर लाँच (Shehzada Trailer Launch) करणार आहेत.

  शहजादा चित्रपटाच्या (Shehzada) पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.पोस्टरमध्ये बंटू आपल्या पांढऱ्या रेट्रो स्कूटरवर डॅशिंग दिसतोय. कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) काळा चश्मा आणि निळ्या रंगाचा शर्ट या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. शहजादा चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर या चित्रपटाचे निर्माते 12 जानेवारी 2023 ला ट्रेलर लाँच (Shehzada Trailer Launch) करणार आहेत. ट्रेलर लाँचच्या तारखेची घोषणा या पोस्टरद्वारे करण्यात आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  या वर्षीचा सगळ्यात अविस्मरणीय ट्रेलर बनवून कृति सेननसह शहजादा भारतातील 3 प्रमुख शहरांमध्येयाला लार्जर दॅन लाईफ उत्सव बनवण्याच्या विचारात आहेत. ट्रेलर 12 जानेवारीला मुंबईत रिलीज होईल. त्यानंतर कार्तिक आणि कृति ही जोडी 13 जानेवारीला जालंधरमध्ये लोहडी आणि 14 जानेवारीला कच्छच्या रणात मकर संक्रांत साजरी करणार आहे.

  शहजादाचं दिग्दर्शन रोहित धवन यांनी केलं आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, कृति सेनन, मनीषा कोइराला, परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर, सनी हिंदुजा आणि अंकुर राठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. संगीत प्रीतम यांनी दिलं असून भूषण कुमार, अल्लू अरविंद आणि अमन गिल यांनी संगीताची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रिलीज होणार आहे.