शेमारू एंटरटेनमेंटच्या सीईओ हिरेन गडा यांना अटक, 70 कोटींच्या फसवणुकीचा आरोप! जामीनावर सुटका

हिरेन गाडा यांनी कोट्यवधी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावा करण्यासाठी अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. ज्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

  शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडचे सीईओ हिरेन गडा (Shemaroo Entertainment CEO Hiren Gada)  यांना केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) विभागाने अटक केली.  70.25 कोटी रुपयांची कर फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या बातमीने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

  नेमका प्रकार काय?

  शेमारू एंटरटेनमेंट ही चित्रपटांची आघाडीची निर्माता कंपनी आहे आणि या कंपनीे अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे.  माहितीनुसार, हिरेन गाडा यांनी कोट्यवधी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावा करण्यासाठी अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. ज्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे हिरेन गडा यांना अटक करण्यात आली आहे, गाडा यांच्याशिवाय सहव्यवस्थापकीय संचालक अतुल मारू आणि मुख्य वित्त अधिकारी अमित हरिया यांनाही अटक करण्यात आली आहे. सीजीएसटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गाडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  अनेक बनावट कंपन्या तयार केल्या

  जीएसटी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन गाडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा दावा करण्यासाठी अनेक बनावट कंपन्या तयार केल्या, ज्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. गाडा  आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा दावा करण्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा दावा करण्यासाठी  ने कोणतीही वस्तू किंवा सेवा न देता 70.25 कोटी रुपयांचे कर क्रेडिट मिळवण्यासाठी बनावट कंपन्या तयार केल्याचे मान्य केले आहे.  शेमारू स्वतःचे मनोरंजन चॅनेल देखील चालवतात. हे DTH सारख्या सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.