शेनिस पॅलासिओसने जिंकला मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुटं, 84 देशाच्या सौंदर्यवतींना मागे टाकतं जिकंली स्पर्धा!

शेनिस पॅलासिओस हिने 72 वी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. मिस युनिव्हर्स 2022 आर बोनीने शेनिस पॅलासिओसचा मुकुट घातला, त्यानंतर ती खूप भावूक झाली. मिस युनिव्हर्स 2023 बनल्याबद्दल जगभरातील लोक तिचे अभिनंदन करत आहेत.

  मिस युनिव्हर्स 2023 च्या विजेतीचं नाव अखेर जाहीर झालं आहे. निकारागुआची शेनिस पॅलासिओस 72 वी मिस युनिव्हर्सची विजेती (Miss Universe 2023 Sheynnis Palacios) ठरली आहे. जगभरातील सौंदर्यवतींना मागे टाकत तिनं हा मुकुट आपल्या नावावर केला आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत श्वेता शारदाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिला मात्र, टॅाप 20 मध्ये जागा मिळवून समाधान मानावं लागलं.

  शेनिस पॅलासिओस झाली भावूक

  मिस युनिव्हर्स 2022 आर बोनी हिने शेनिस पॅलासिओसला मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट घातला आहे. मुकुट परिधान केल्यानंतर शानिस पॅलासिओस खूप भावूक झाला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्ट दिसत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी शॅनिस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली महिला आहे. त्यामुळे ‘ब्युटी क्वीन’ हे खिताब जिंकणे तिच्यासाठी आणखीनच महत्त्वाचे आहे.

  ‘या’ सुंदरींनी टॉप 3 मध्ये मिळवलं स्थान

  यावेळी थायलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सौंदर्यवतींनी टॉप 3 मध्ये आपले स्थान निश्चित केले होते. पण या दोघांना पराभूत करत शॅनिस पॅलासिओसने मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट जिंकला आहे. थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड ही सौंदर्य स्पर्धेत पहिली उपविजेती ठरली, तर ऑस्ट्रेलियाच्या मोराया विल्सनला द्वितीय उपविजेतेपदाचा मुकुट देण्यात आला.

  भारताच्या श्वेता शारदा टॉप 20 मध्ये स्थान

  यावर्षी चंदीगडमध्ये जन्मलेल्या श्वेता शारदाने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने टॉप 20 फायनलिस्टमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, तिला ताज जिंकता आला नाही. त्याच वेळी, या वर्षी पाकिस्ताननेही पहिल्यांदा मिस युनिव्हर्स 2023 मध्ये पदार्पण केले.

  84 देशांतील सौंदर्यवतींमधे पार पडली स्पर्धा

  एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथे आयोजित 72 व्या मिस युनिव्हर्स 2023 च्या भव्य कार्यक्रमात, 84 देशांतील सौंदर्यवतींनी एकमेकांविरुद्धच्या स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये शेनिस पॅलासिओसने सर्वांना मागे टाकून स्पर्धा जिंकली.