shilpa shetty

शिल्पा शेट्टीनं (Shilpa Shetty ) सोशल मीडियापासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Shilpa Shetty Break From Social Media ) एक पोस्ट शेअर करत, शिल्पानं यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.

    शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) ही कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रोजचे अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. मात्र काही दिवस आता आपल्याला शिल्पा शेट्टीचे अपडेट्स सोशल मीडियावर पाहता येणार नाहीत. कारण शिल्पानं सोशल मीडियापासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.(Shilpa Shetty Break From Social Media ) एक पोस्ट शेअर करत, शिल्पानं यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.


    शिल्पानं फक्त ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो आणि काही ओळी लिहून आपण सोशल मीडियातून  ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे. ‘मी या मोनोटोनीला कंटाळले आहे. सगळं काही एकसारखं दिसतं. जोपर्यंत एक नवा अवतार पाहायला मिळत नाही, तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जातेय,’असं तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरवरही तिनं हीच पोस्ट शेअर केली आहे.

    शिल्पाला इन्स्टाग्रामवर २५.५ मिलियन लोक फॉलो करतात तर ट्विटरवर तिचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.शिल्पा सध्या गोव्यात आहे. येथे ‘इंडियन पुलिस फोर्स’ या रोहित शेट्टीच्या सीरिजचं शूटींग सुरू आहे. रोहित शेट्टीच्या सीरिजमध्ये ती महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.