शिल्पा शेट्टीच्या घरी ख्रिसमसची तयारी, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रत्येक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असते. तसेच ती सेलिब्रेशनची देखील जोरदार तयारी करत असते. याचे फोटो आणि व्हीडिओ ती सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर करत राहते. डिसेंबर येताच प्रत्येकजण उत्सवाच्या आनंदात भारावून जात असतो. अशा परिस्थितीत शिल्पा ख्रिसमसच्या तयारीत व्यस्त असून तिच्यासोबत मुलगा वियानदेखील ख्रिसमस ट्री डेकोरेशनसाठी मदत करत आहे. शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.

या व्हीडिओत वियानसोबत ख्रिसमस ट्री डेकोरेट करताना शिल्पा दिसत आहे. यावेळी वियान हा कँडी केन खाताना दिसत आहे. हा व्हीडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला वाटले की, कँडी केन खपूच टेस्टी असेल. या सणासाठी एकत्रितपणे झाडे सजवणे ही एक आवडती परंपरा आहे, हा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शिल्पा शेट्‌टीने यापूर्वी करवाचौथ आणि दिवाळी सेलिब्रेशनचे व्हीडिओदेखील पोस्ट केले होते.