shilpa shetty marriage photos

शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) यांच्या लग्नाला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. (Shilpa Shetty And Raj Kundra Marriage Anniversary)लग्नाच्या १२ व्या वाढदिवसानिमित्ताने शिल्पाने त्यांच्या लग्नातील(Shilpa Shetty Marriage Photos) काही फोटो शेअर केले आहेत.

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचे दिसते. शिल्पा सोशल मीडियावर(Social Media) स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून शिल्पा पती राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे (Pornography Case)चर्चेत होती. शिल्पा आणि राजच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच सोशल मीडियावर फोटो शेअर करत शिल्पाने घटस्फोटाच्या चर्चा या अफवा असल्याचं दाखवून दिलं आहे.

    शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. शिल्पा आणि राज कुंद्राचे लग्न २२ नोव्हेंबर २००९ साली झाले आहे. शिल्पा आणि राज यांच्या लग्नाला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या १२ व्या वाढदिवसानिमित्ताने शिल्पाने त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.

    हे फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले आहे की, “१२ वर्षांपूर्वी आपण चांगल्या आणि वाईट काळात साथ देण्याचे, एकमेकांवर कायम प्रेम करण्याचे, विश्वास ठेवण्याचे वचन दिले होते. ते असेच सुरु ठेवू, आम्हाला दररोज मार्ग दाखव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुकी राज कुंद्रा. आपल्या मुलांसाठी, अनेक इंद्रधनुष्य, आनंद आणि बरचं काही. चांगल्या आणि वाईट काळात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या आमच्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार”.