‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा प्रोमो शेअर केल्यावर शिल्पा झाली ट्रोल, नेटकर्‍यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’(Indias Got Talent Promo) या शोमध्ये जज म्हणून काम करणार आहे. शिल्पाने या शोचा प्रोमो नुकताच शेअर केला. या प्रोमोमुळे ती खूप ट्रोल(Shilpa Shetty Troll) झाली आहे. नेटकऱ्यांनी शिल्पा आणि राज कुंद्रावर निशाणा साधला आहे.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात(Pornography Case) अटक झाली होती. राज कुंद्राची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे. मात्र या प्रकरणामुळे शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर खूप टीका होत आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमध्येही काही दिवस दिसली नव्हती. एक महिन्यानंतर ती या शोच्या शूटिंगसाठी पुन्हा परतली होती. आता शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’(Indias Got Talent Promo) या शोमध्ये जज म्हणून काम करणार आहे. शिल्पाने या शोचा प्रोमो नुकताच शेअर केला. या प्रोमोमुळे ती खूप ट्रोल(Shilpa Shetty Troll) झाली आहे. नेटकऱ्यांनी शिल्पा आणि राज कुंद्रावर निशाणा साधला आहे.


    एक युजर कमेंट करत म्हणाला, “राज कुंद्राकडे एक से बढकर एक खूप टॅलेंट आहे. मॅम त्यांनाही बोलवा टीव्हीवर आम्हालादेखील पाहू द्या”,दुसरा म्हणतो, “तुमच्या पतीचं टॅलेंट दाखवा.” आणखी एक युजर म्हणाला, “कुंद्रादेखील आपलं टॅलेंट दाखवू शकतो.”

    shilpa shetty troll

    शिल्पाच्या एका वक्तव्यावर निशाणा साधत एक युजर म्हणाला, “बेस्ट टॅलेंट-पत्नीला पती काय करतोय हेच ठाऊक नाही किंवा जाणून घेण्याची इच्छा नाही”. अनेक नेटकऱ्यांनी राज कुंद्रावरून शिल्पावर निशाणा साधला आहे.