shilpa shetty and samisha

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty Instagram Video) आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आपली मुलगी समिशाला (Samisha Video) प्राण्यावर प्रेम (Animal Love) करायला शिकवत आहे.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात आहे. शिल्पाने नुकताच एक व्हिडीओ (Samisha Chanting Gayatri Mantra)शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओचं (Shilpa Shetty Viral Video) सगळेजण कौतुक करत आहेत. ज्यात ती आपली मुलगी समिशाला (Samisha Viral Video) भूतदयेचे धडे देताना दिसत आहे.

    शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आपली मुलगी समिशाला प्राण्यावर प्रेम करायला शिकवत आहे. या व्हिडीओत शिल्पाच्या घराजवळ एक कावळा जखमी अवस्थेत दिसत आहे. यावेळी ती आपली मुलगी समिशाला जखमी कावळ्यासाठी प्रार्थना करायला सांगताना दिसत आहे. यावेळी तिने समिशाला हा जखमी कावळा लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी ‘ओम साई राम’ म्हणायला सांगितलं. तसंच ती ‘गेट वेल सून बर्डी’, असं म्हणायला सांगताना दिसत आहे. समिशानेही हात जोडलेले दिसून येत आहेत. तसेच कावळा बरा व्हावा म्हणून गायत्री मंत्रही म्हटल्याचे दिसून येत आहे.

    या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले आहे की,  ‘समिशा अजून २ वर्षांची देखील झालेली नाही. तरी ती या कावळ्यासाठी प्रार्थना करतेय. मुलं सहृदयी असतात. ते निर्मळ मनाने प्रार्थना करतात. समिशाने मोठं झाल्यावरही या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एवढीच अपेक्षा.’ सोबतच तिने या कावळ्याचा जीव वाचवल्याबद्दल पेटा संस्थेचे आभार मानले आहेत.