shivleela patil

शिवलीला पाटील(Shivleela Patil Out From Bigg Boss Marathi) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

    कलर्स मराठीवर(Colors Marathi) ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Bigg Boss Marathi 3) मराठी मनोरंजन विश्वातील १५ जण बिग बॉसच्या घरात राहात आहेत.मात्र या १५ जणांपैकी एकजण घराबाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे. शिवलीला पाटील(Shivleela Patil Out From Bigg Boss Marathi) बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.

    कुठलेही एलिमिनेशन किंवा स्पर्धेमुळे शिवलीला बाहेर पडलेली नाही. तब्येत ठीक नसल्याने तिला वैद्यकीय उपचारांसाठी बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागत आहे.या आठवड्यातील नॅामिनेटेड सदस्या शिवलीला पाटील यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या काही काळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॅासच्या घराबाहेर असतील. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद असणार आहेत. कलर्स मराठीने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

    इतर १४ स्पर्धकांसोबत युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलने (Shivlila Patil) देखील या घरात प्रवेश केला होता. युवा कीर्तनकार शिवलीलाचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. तिचा असा एक वेगळा चाहता वर्ग आहे.