अनन्या पांडेच्या चौकशीनंतर समोर आली धक्कादायक माहिती : NCBचा मोठा खुलासा

एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत.

    बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी काल(गुरूवार) एनसीबीने छापा टाकला होता. तसेच काल जवळपास दोन तास तिची चौकशी केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा अनन्याला एनसीबीने बोलावलं होतं. परंतु एनसीबीने चौकशीसाठी बोलावल्याने मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता एक नवं वळण लागलं आहे.

    चौकशीदरम्यान एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने आर्यन आणि अनन्या यांचे काही चॅट्स मिळवले आहेत. या चॅट्समधून असं दिसत आहे की, अनन्या आर्यनला गांजा मिळवून देण्यासाठी तयार होती. या चॅट्सबद्दल एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला विचारलं असता, आपण केवळ आर्यनची थट्टा करत होतो, असं उत्तर अनन्याने दिलं आहे.

    बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या  तपासाची व्याप्ती वाढत आहे.  एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला आहे. गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले.