‘शूट है या ट्रूथ है?’ नव्या प्रोजेक्टच्या सेटवर रणबीर कपूरला अश्रू अनावर

अलीकडेच व्हायरल झालेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे नेटिझन्सना अभिनेत्याच्या भावनिक उद्रेकामागील कारण काय असा प्रश्न पडला आहे.

  • बॉलिवूड हार्टथ्रोबच्या भावनिक उद्रेकाच्या व्हिडिओने नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) आघाडीचा अभिनेता आणि सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकताच एका आगामी प्रोजेक्टच्या सेटवर ‘रडताना’ दिसला. रणबीर आघाडीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो.

रणबीर मोठ्या पडद्यावर भूमिका साकारताना रडण्यापासून मागे हटत नाही.

अलीकडेच व्हायरल झालेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे नेटिझन्सना अभिनेत्याच्या भावनिक उद्रेकामागील कारण काय असा प्रश्न पडला आहे.

रणबीरच्या अश्रूपूर्ण क्षणाच्या या गुपचूप टिपलेल्या व्हिडिओमुळे त्याचे चाहते गोंधळून गेले आहेत. काहींचा असा विश्वास आहे की हे आगामी शूटमधील एक दृश्य आहे, तर काहीजण भावनिक उद्रेकामागील खरे कारण काय आहे याचा अंदाज घेत आहेत.

“रणबीर प्लीज़ रोना?? मत.. आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम करतो”, “हे निश्चितपणे एक गिमिक आहे”, या आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा पाऊस या व्हिडियोवर पडत असून त्याला आतापर्यंत ५० हजार views मिळाले आहेत.

रणबीरच्या उत्तम अभिनय कौशल्याचं हे द्योतक आहे की त्याच्या आयुष्यातील एखाद्या घटनेमुळे त्याला अश्रू अनावर झाले, हे कळण्यासाठी मात्र चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.