अनुष्का दिसणार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामींच्या भुमिकेत, ‘चकदा एक्सप्रेस’च्या शुटींगला सुरुवात

अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का आता कमबॅक करणार आहे.

    अनेक दिवसापासून मोठ्या पडद्यावरून गायब झालेली अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma)शर्मा लवकरच नव्या चित्रपटातून कम बॅक करणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda Express) या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. (Anushka Sharma Shoots Begins Chakda Express)

    चकदा एक्सप्रेस हा क्रिडा विषयावर आधारित चित्रपट आहे.भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा हा बायोपिक आहे. अनुष्का झुलन गोस्वामींच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्काने सोशल मीडियावर ‘चकदा एक्सप्रेस’ सिनेमाच्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधीच अनुष्काने सिनेमावर काम करायला सुरुवात केली आहे. या सिनेमासाठी अनुष्का खूप मेहनत घेत आहे. अनुष्काचे ट्रेनिंग दरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनुष्काच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

    अनुष्का ‘झिरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण ‘चकदा एक्सप्रेस’ या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का आता कमबॅक करणार आहे.