श्रावण स्पेशल ‘शिव शंकर दानी’ गाणं रिलीज, खेसारी लाल यादव दिसला भगवान शिवाची पूजा करताना…

भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादवचं नवीन श्रावण स्पेशल 'शिव शंकर दानी' गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं खेसारी लाल यादवने गायलं असून विशाल भारती यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

    भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादवचं नवीन श्रावण स्पेशल ‘शिव शंकर दानी’ गाणं रिलीज झालं आहे. या व्हिडिओ गाण्यात अभिनेत्री नेहा पाठकसोबत अभिनेता भगवान शिवाची पूजा करताना दिसत आहे. खेसारी लाल यादव देखील कंवरियाच्या भूमिकेत हार्मोनियम वाजवताना दिसतो. हे गाणं खेसारी लाल यादवने गायलं असून विशाल भारती यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हे गाणे आर्या शर्माने संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं झी म्युझिक भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलं जात आहे. आता हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं आहे.