Shreyas (5)

श्रेयस तळपदेचा ही अनोखी गाठ हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या 1 तिकीटावर एक तिकीट मिळणार फ्री मिळणार आहे.

    अभिनेता श्रेयस तळपदे नव्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. श्रेयस तळपदे आणि गौरी इंगावले यांची मुख्य भुमिका असलेला ही अनोखी गाठ चित्रपट शुक्रवारी  (1 मार्च) ला प्रदर्शित झाला. या चित्रपटावर प्रेक्षकांसाठी एक भन्नाट ऑफर देण्यात येत आहे. या चित्रपटाच्या एका तिकीटावर 1 तिकीट फ्री देण्यात येणार आहे.

    सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती

    या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस तळपदे आणि गौरी इंगावले ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रिलिज झालेल्या गाण्यांनाही प्रेक्षकांनी पंसती दर्शवली. आता चित्रपट रिलीज झाला असून आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी यासाठी एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर 1 मार्चपासूनच लागू होणार आहे. बूक माय शोवर तुम्ही HEAGBOGO हा कूपन कोड वापरुन तुम्ही ही ऑफर वापरु शकता. आपल्या माणसांच्या सोबतीने पाहा, ‘ही अनोखी गाठ’ ची प्रेक्षकांना 1 वर १ फ्री ची स्पेशल ऑफर, मग आजच तिकीट बुक करा, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टवर दिलं आहे.

    श्रेयसचं कमबॅक

    अभिनेता श्रेयस तळपदेला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्याने पूर्णपणे आराम केला. पण आता श्रेयस पूर्णपणे बरा झाला असून तो ही अनोखी गाठ या चित्रपटातून दमदार कमबॅक करणार आहे. दरम्यान चाहते देखील त्याच्या या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहे.