‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं इथंच भोगावी लागेल…’ श्रेयस तळपदे-विजय राजच्या ‘कर्तम भुगतम’चा ट्रेलर रिलीज!

श्रेयस तळपदे आणि विजय राज यांचा आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'कर्तम भुगतम'चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

  सध्या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची खूप पंसती मिळत आहे. अशा चित्रपटांना सिनेमागृहात जाऊन बघण्याला प्रेक्षक प्राधान्य देतात. आता असाच एक नवा कोरा टकर्तम भुगतम’ (Kartam Bhugtam ) हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) आणि विजय राज ( Vijay Raaz ) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तुम्हाला कर्म आणि नियतीच्या एका रोमांचक प्रवासात घेऊन जाईल.  मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अनेक रहस्याने भरलेल्या जगाची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

  श्रेयसनं सोशल मीडियावर शेअर केला ट्रेलर

  काल आणि लक यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोहम पी शाह याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिनेता श्रेयसने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाच ट्रेलर रिलीज केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)