
परंतु काही दिवसानंतर तिला प्रोडक्शन हाऊस मधून फोन आला आणि ती चर्चा जोरदार रंगली. शेवटी तिने ही भूमिका स्वीकारली होती.
“ससुराल सिमर का” ही मालिका कलर्स हिंदी वाहिनीवर प्रसिद्ध होती आणि आता या मालिकेचा दुसरा भाग ही पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री “शुभांगी तांबाळे” ही दिसणार आहे. शुभांगीने मराठी सिने सृष्टीत बॉईज 2 व लकी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि आता हिंदी सिनेसृष्टीत तिला मोठा ब्रेक मिळणार आहे.
” ते प्रोडक्शन हाऊस असो अथवा मालिकेची लोकप्रियता असो अशा अनेक कारणांमुळे मी या मालिकेतील भूमिकेसाठी त्वरित होकार दिला. मी ही एक सुवर्णसंधी मानत आहे कारण आतापर्यंत माझे प्रेक्षक फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित होते कारण माझी प्रमुख कामं मराठी इंडस्ट्रीत आहेत पण आता संपूर्ण देश माझे प्रेक्षक होतील. ” या मालिकेचे चित्रीकरण थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. असं शुभांगी या भुमिकेविषयी बोलताना म्हणाली.
View this post on Instagram
शुभांगीसाठी हे सगळे नवीन असल्यासारखे असेल. या मालिकेच्या ऑडिशन बद्दल तिने सांगितले, एक अभिनेता म्हणून आम्ही ऑडिशन देतच असतो आणि जेव्हा मी ऑडिशन ला गेले होते त्यावेळेस माझ्या मैत्रिणीकडून तिचे सामान घेतले होते . माझ्या कानात एकच झुमका होता कारण मी घाईगडबडीत दुसरा गमावला. त्यामुळे मला वाटले की ते मला परत कधीच कॉल करणार नाहीत.
View this post on Instagram
परंतु काही दिवसानंतर तिला प्रोडक्शन हाऊस मधून फोन आला आणि ती चर्चा जोरदार रंगली. शेवटी तिने ही भूमिका स्वीकारली होती.
View this post on Instagram