श्वेता तिवारी आणि मुलगी पलक करतेय दुर्लक्ष, आई-वडिलांनीही केले दूर, राजा चौधरींच्या नात्यातल्या वेदनांना उधाण

अभिनेता राजा चौधरीने इंडस्ट्रीत खूप काम केले पण कामापेक्षा त्यांचे लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्य चर्चेत होतं.

    अभिनेता राजा चौधरीने इंडस्ट्रीत खूप काम केले पण कामापेक्षा त्यांचे लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्य चर्चेत होतं. राजा चौधरीला शिवीगाळ करणारा नवरा, मद्यपी आणि रागीट स्वभावाची व्यक्ती म्हणून सादर करण्यात आले.  राजा चौधरीने नुकतेच श्रद्धा शर्मासोबतचे नाते तुटण्याच्या कारणांबद्दल सांगितले आणि त्यांना कसे चुकीचे दाखवले गेले हे सांगितले.

    राजा चौधरीने पहिले लग्न श्वेता तिवारीसोबत केले होते हे सर्वांना माहीत आहे. पण हे लग्न यशस्वी झाले नाही. श्वेताला राजा चौधरीपासून एक मुलगी झाली, तिचे नाव पलक तिवारी आहे. ती सध्या आई श्वेतासोबत राहते. राजा चौधरीशी दीर्घकाळ राहील्यानंतर श्वेताने त्याच्यासोबतचे सर्व संबंध संपवले होते, आज श्वेता आणि राजा एकमेकांच्या संपर्कात नाहीत आणि आता मुलगी पलकही त्याच्याकडे दुर्लक्ष करते. ती वडिलांच्या ईमेल किंवा मेसेजला प्रतिसाद देत नाही. त्याच वेळी, राजाने असेही सांगितले की त्याचे स्वतःचे पालक देखील त्याला चांगले मानत नाहीत. त्याने सांगितले की त्याला विश्वास आहे की, त्याच्या पालकांना त्याची गरज नाही.

    राजा चौधरीने त्याच्या नशेच्या व्यसनाबद्दल सांगितले. त्याने कबूल केले की आपल्याला दारूचे व्यसन जडले असून ते सोडण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याने डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला आहे. आपल्याला नेहमीच चुकीचे दाखवण्यात आले आहे, अशी कबुली राजा चौधरीने दिली.