बंगळुरूमध्ये रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात, ड्रग्ज टेस्टमध्ये आढळला पॉझिटिव्ह

सिद्धांत कपूर हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. पण आजपर्यंत अशी एकही भूमिका त्याची ओळख होऊ शकली नाही.

    बंगळूरू – शक्ती कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत यालाड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. बेंगळुरूमधील एमजी रोडवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी सिद्धांतसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत.

    सिद्धांत कपूर हा ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. पण आजपर्यंत अशी एकही भूमिका त्याची ओळख होऊ शकली नाही. हसीना पारकर या चित्रपटात सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाचीही अवस्था त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच फ्लॉप ठरली.

    ड्रग्ज प्रकरणात सिद्धांतची बहीण श्रद्धा कपूरचे नावही आले होते. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर एनसीबीच्या रडारखाली आली होती. या संदर्भात एनसीबीच्या टीमने श्रद्धा कपूरचीही चौकशी केली होती. श्रद्धा कपूर आणि सुशांत यांनी एकत्र छिछोरे हा चित्रपट केला होता. श्रद्धा कपूरबद्दल असं म्हटलं जात होतं की, ती अनेकदा लोणावळ्यातील सुशांतच्या फार्म हाऊसवर पार्टीत गेली होती. चौकशीदरम्यान, अभिनेत्रीने एनसीबीला सांगितले की ती पार्टीत सहभागी झाली होती, परंतु ड्रग्स घेतलेली नाही. श्रद्धाने ड्रग्ज घेण्यास पूर्णपणे नकार दिला होता.