cirkus team

रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॉनी लीव्हर, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, संजय मिश्रा, टिकू तलसानिया, व्रजेश हिरजी, सिद्धार्थ जाधव आणि अश्विनी काळसेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सर्कस’(Cirkus) २३ डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

    अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सुपरस्टार रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) ‘सर्कस’(Cirkus) चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिद्धार्थने यापूर्वी रणवीरसोबत ब्लॉकबस्टर ‘सिंबा’मध्ये काम केले होते आणि तो ‘सर्कस’ चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

    रणवीरबद्दल सिद्धार्थ म्हणाला, “आम्ही एकत्र हैदराबादला गेलो होतो तेव्हा तो मला भेटला. माझ्यासोबत त्याने सेल्फी घेतले ते मी कधीही विसरणार नाही. आमचे एक वेगळे नाते आहे. आम्ही नवीन गोष्टी शिकण्यास नेहमी उत्सुक असतो. रोहित सरांनी नमूद केल्याप्रमाणे एकदा रणवीर त्याच्या पात्रात आल्यावर तो फक्त चित्रपटाचा विचार करतो. मला आठवते की एकदा मृत्यूचा सीन होता आणि तो एका कोपऱ्यात बसला होता. त्यानंतर त्याने ज्या पद्धतीने सादरीकरण केले ते केवळ अविश्वसनीय होते. मला वाटते की त्याला नवीन गोष्टी शिकण्याची भूक आहे. माझा ठाम विश्वास आहे की तो एक दिग्दर्शकाचा अभिनेता आणि एक अद्भुत सहकलाकार आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण ते मान्य करेल. रणवीर आणि माझी घट्ट मैत्री आहे. एक अभिनेता म्हणून तो मनाला भिडतो.”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)


    रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॉनी लीव्हर, जॅकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, संजय मिश्रा, टिकू तलसानिया, व्रजेश हिरजी, सिद्धार्थ जाधव आणि अश्विनी काळसेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सर्कस’ २३ डिसेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.