Animal (6)

ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष करनैल सिंग पीर मोहम्मद यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून चित्रपटातील शीख धर्मीयांशी संबंधित वादग्रस्त दृश्य हटवण्याची मागणी केली आहे.

    ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या शेवटी एका दृश्यात रणबीर कपूर (Animal Movie Controversy) एका गुरसिखवर सिगारेटचा धूर उडवताना दिसत आहे आणि दुसऱ्या दृश्यात गुरसिखच्या दाढीवर चाकू ठेवलेला दाखवण्यात आलं आहे. आता या सीनवरून गदारोळ सुरू झाला आहे. ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष करनैल सिंग पीर मोहम्मद यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून चित्रपटातील शीख धर्मीयांशी संबंधित वादग्रस्त दृश्य हटवण्याची मागणी केली आहे.

    संघटनेने पत्रात इशारा दिला आहे की, चित्रपटातून शीख धर्मीयांशी संबंधित वादग्रस्त दृश्ये हटवली नाहीत, तर येत्या काही दिवसांत शीख संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. याशिवाय स्टुडंट फेडरेशनने ‘अ‍ॅनिमल’ फिमेलमधील ‘अर्जुन व्हॅली’ या प्रसिद्ध गाण्यावरही आक्षेप नोंदवला असून या सर्व दृश्यांवर कारवाई करण्याची मागणी सेन्सॉर बोर्डाकडे केली आहे.

    कर्नेल सिंह यांनी मीडियाला सांगितले की, ‘चित्रपटात श्री गुरु गोविंद सिंग जी यांनी गायलेलं पारंपरिक ऐतिहासिक गाणे चित्रपटात गुंडगिरी आणि टोळीयुद्धासाठी वापरलं जात आहे. तो शीख समाजाच्या भावना दुखावणार आहे. तर, चित्रपटातील ‘अर्जन व्हॅली’ या गाण्यावरही शीख समुदायानं आक्षेप घेत आहे. हे गाणं परदेशात धुमाकूळ घालत आहे

    अ‍ॅनिमलचं आतापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन

    अ‍ॅनिमल हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 ला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 72.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 39.9 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी मंगळवारी  37.47 कोटी आणि बुधवारी सहाव्या दिवशी  30.39 कोटींची कमाई केली. सातव्या दिवशी 25.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. तर अकराव्या दिवशी 13 कोटींंची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या 11 दिवसांत या चित्रपटाने 432.27 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 750 कोटींची कमाई केली आहे.