
दीपिका पदुकोणने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'सिंघम अगेन' चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या नव्या लूकमध्ये दीपिका खूपच खतरनाक दिसत आहे.
सिंघम अगेन : ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची चर्चा प्रचंड सुरु आहे. रोहित शेट्टी यांचा या चित्रपटाची चर्चा होत आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा नवा लुक समोर आला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या आगामी चित्रपटामध्ये ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचा समावेश आहे. या सिनेमात अजय देवगन दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आता या सिनेमातील दीपिकाचा खतरनाक लूक समोर आला आहे.
दीपिका पदुकोणने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या नव्या लूकमध्ये दीपिका खूपच खतरनाक दिसत आहे. रोहित शेट्टीने अभिनेत्रीचे वेगवेगळ्या रुपातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘सिंघम अगेन’ सिनेमातील दीपिकाचा लूक शेअर करत रोहित शेट्टीने लिहिलं आहे,”नारी सीता का भी रूप है और दुर्गा का भी…यए हमारी शक्ती शेट्टी…मेरी लेडी सिंघम..दीपिका पदुकोण”. रोहित शेट्टीने शक्ती शेट्टीला सर्वात क्रूर ऑफिसर म्हंटले आहे. दीपिकाने पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,”शक्ती शेट्टीची ओळख करून देत आहे”.
View this post on Instagram
‘सिंघम अगेन’ हा सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अजय देवगन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. ‘सिंघम अगेन’ आणि अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. ‘सिंघम अगेन’ या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची झलक दिसणार आहे. अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसेल. तर करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.