singham again simba first look

‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटातील रणवीर सिंहचा (Ranveer Singh)फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

  रोहीत शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित ‘सिंघम’ (Singham) चित्रपट लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटात अजय देवगणची (Ajay Devgan) मुख्य भूमिका होती. या चित्रपटाच्या दुसरा भाग ‘सिंघम 2’लाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिंघम अगेन’ (Singham Again) या चित्रपटातील रणवीर सिंहचा (Ranveer Singh)फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. रणवीरचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

  अजय देवगण आणि रोहित शेट्टीने रणवीरचा हा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिंघम अगेन चित्रपटात रणवीर ‘संग्राम भालेराव (सिंम्बा)’ हे पात्र साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘सिंघम अगेन’मधील दीपिका आणि टायगर श्रॉफचा लूक प्रदर्शित झाला होता. चित्रपटात दोघेही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. आता रणवीरचा रावडी लूक समोर आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

  ‘सिंघम अगेन’मध्ये अजय देवगणसह अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफ हे कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती. या शूटींगचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याआधीही रोहित शेट्टीने सिंघम अगेनच्या सेटवरील शूंटीगदरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. 15 ऑगस्टला ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर वेगळा मुकाबला बघायला मिळणार आहे.