मालिकांमध्ये काम करण्याआधी McDonald’s मध्ये नोकरी करायच्या स्मृती इराणी, तुम्हाला माहितेय का? मिका सिंगच्या त्या गाण्यातही केली होती भूमिका!

२००१ मध्ये आलेल्या 'रामायण' मालिकेत त्यांनी सीतेची भूमिकाही केली होती. त्याशिवाय स्मृती यांनी 'विरुद्ध' 'तीन बहुरानियां' आणि 'एक थी नायिका' या मालिकांतही काम केलं.

  अभिनेत्री , खासदार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज ४५ वा वाढदिवस आहे. आत्तापर्यंत हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी सून अशी ओळख असणाऱ्या स्मृती इराणी यांचा मॉडेलिंगपासून अभिनेत्री आणि तिथपासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. सध्या त्या वस्रोद्योग व बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आहेत.

  मॅकडोनाल्ड्मध्ये नोकरी

  १९९८ मध्ये स्मृती इराणी यांनी मिस इंडिया पेजेंट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्याचवर्षी गायक मिकासिंगच्या ‘सावन में लग गई आग’ या गाण्यातही त्या दिसल्या होत्या. पण तुम्हाला माहिती आहे का? मॉडेलिंगच्या क्षेत्रात येण्याआधी त्यांनी मॅकडोनाल्ड्मध्ये नोकरी केली होती.

  मालिका गाजवल्या

  २००० मध्ये स्मृती यांनी ‘आतिश’, ‘हम हैं कल आज और कल’ या मालिकांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेतील भूमिकेने त्यांना वेगली ओळख मिळवून दिली.  या मालिकेमुळे त्या घरोघरी पोहोचल्या. या मालिकेत स्मृती यांनी केलेल्या तुलसी या भूमिकेसाठी त्यांना पाच इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड, ४  इंडियन टेली अवॉर्ड आणि ८ स्टार परिवार अवॉर्ड्स मिळाले होते. २००१ मध्ये आलेल्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी सीतेची भूमिकाही केली होती. त्याशिवाय स्मृती यांनी ‘विरुद्ध’ ‘तीन बहुरानियां’ आणि ‘एक थी नायिका’ या मालिकांतही काम केलं.

  २००३ मध्ये स्मृती यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि टीव्हीच्या दुनियेला रामराम ठोकला. त्यानंतर आता त्या केंद्रीय मंत्री आहेत. राजकारणातील त्यांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे २०१९  मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात पराभव केला.