
सध्या राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या स्मृती इराणी यांनी याआधी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसीची भूमिका तर प्रचंड गाजली. सध्या स्मृती इराणी त्यांच्या मोठ्या मुलीच्या म्हणजेच शनैलच्या (Shanelle Irani Wedding) लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा मंगळवारी पार पडला. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा लग्नबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नानंतर आता राजस्थानमध्ये आणखी एक मोठं लग्न होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आपल्या लेकीचं राजस्थानमध्ये शाही थाटात लग्न करणार आहेत. (Smriti Irani Daughter Wedding)
सध्या राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या स्मृती इराणी यांनी याआधी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसीची भूमिका तर प्रचंड गाजली. सध्या स्मृती इराणी त्यांच्या मोठ्या मुलीच्या म्हणजेच शनैलच्या (Shanelle Irani Wedding) लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत.
View this post on Instagram
शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शनैलचं लग्न आणि त्याचदरम्यानचे विधी 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहेत. यासाठी स्मृती इराणी अगदी जोरदार तयारी करत आहेत. लेकीच्या लग्नासाठी त्यांनी खास डेस्टिनेशन निवडलं आहे. स्मृती इराणी राजस्थान येथील खींवसर फोर्ट येथे लेकीचं लग्न करणार आहेत.
शनैल ही जुबिन इराणी यांची पहिली पत्नी मोना यांची मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2021मध्ये शनैलचा अर्जुन भल्लाबरोबर साखरपुडा पार पडला. खींवसर फोर्टमध्येच अर्जुनने शनैलला लग्नाची मागणी घातली होती. आता याच ठिकाणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये असलेला खींवसर किल्ला हा 500 वर्ष जुना आहे. मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर व नागौरच्या मध्यभागी हा किल्ला आहे.
फोर्टमध्ये 71 खोल्या,4 रेस्टॉरंट
या फोर्टमध्ये साधारण 71 खोल्या आहेत. तसेच या किल्ल्यामध्ये 4 रेस्टॉरंटही आहेत. याशिवाय 18 टेन्ट या किल्ल्यामध्ये बांधण्यात आले आहेत. तसेच इथे स्विमिंग पूल, जिम, स्पाही उपलब्ध आहे. यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की शाही पद्धतीने स्मृती इराणींच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. शनैल ही वकील आहे. तिने मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून लॉ ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून एलएलएम पदवी पूर्ण केली.
स्मृती इराणींचा जावई अर्जुन भल्ला आहे तरी कोण ?
स्मृती इराणींचा जावई अर्जुन भल्ला याचा जन्म टोरंटोमध्ये झाला आहे. त्याचं शिक्षणदेखील तिथेच झालं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीसेस्टरमधून त्याने एलएलबी केलं आहे. तो 2014 पासून अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करत आहेय अनेक कंपन्यांमध्ये त्याने लिगल इंटर्न म्हणूनही काम केलं आहे. सध्या अर्जुन लंडनमध्ये एमबीए करत आहे. अर्जुन भल्लाला अमर नावाचा एक भाऊ आहे. आईचं नाव सबीना आणि वडीलांचं नाव सुनील आहे.