…मग तुम्हाला हा निर्णय घ्यायला अडीच वर्ष का लागली? अभिनेता सुमीत राघवनचा एकनाथ शिंदेंना सवाल

सुमीत राघवनने ट्वीटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. (Actor sumeet raghvan tweeter account post) या पोस्टमध्ये सुमीतने वर्तमान पत्रातील एक लेख शेअर केला आहे. हा लेख शेअर करत सुमीत म्हणाला की, “एक साधा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?” असा सवाल सुमीतनं एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) विचारला आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 48 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) थांबले आहेत. एकनाथ शिंदेंच्या या नाराजीनाट्यावर आता या सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर मीम्स व जोक्स फिरू (Social mims jokes) लागले आहेत. काल अभिनेता हेमंत ढोमे व आरोह वेलणकर (Actor Hemant Dhome and Aroh welankar) यांच्या प्रतिक्रियेनंतर आता अभिनेता सुमीत राघवननं (Actor sumeet Raghvan) सुद्धा यावर व्यक्त झाला आहे.

    सुमीत राघवनने ट्वीटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. (Actor sumeet raghvan tweeter account post) या पोस्टमध्ये सुमीतने वर्तमान पत्रातील एक लेख शेअर केला आहे. हा लेख शेअर करत सुमीत म्हणाला की, “एक साधा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?” असा सवाल सुमीतनं एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) विचारला आहे.

    दरम्यान, सुमीतच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद देत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?” तसेच अन्य नेटकऱ्यांनी सुमातच्या या पोस्टवर बरेच कंमेंन्ट केल्या आहेत. एकीकडे शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु असताना आता यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.