स्वत:च्या मृत्यूचं कांड रचणाऱ्या पूनम पांडेच्या अडचणी वाढल्या, ‘या’ प्रसिध्द इन्फ्लुएन्सरनं पोलिसांत केली तक्रार

    काही दिवसापुर्वी मॅाडेल आणि अभिनेत्री निधन झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीनं फॅन्ससह सेलेब्रिटिंनीही मोठा धक्का बसला होता. त्यांनतर पूनमनं जीवंत असल्याचं स्वत: सांगितलं. मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावर लोकांनी पूनमला चांगलच सुनावलं यामध्ये नेटकऱ्यांसह सेलेब्रिटिंचांही समावेश आहे. तर, ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’ (all india cine workers association) नं पूनम पांडेविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आता पूनमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. स्वत च्या मृत्यूचं कांड रचणाऱ्या पूनमविरोधात एका सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर आणि रिॲलिटी शो फेम फैजान अन्सारीने तक्रार केली आहे. त्याने कानपूर पोलीस आयुक्तांना अर्ज दिला आहे. अर्जात पूनम पांडेला अटक करण्याची मागणी केली आहे.

    काय म्हणाला फैजान अन्सारी?

    डेटिंग बाजी या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेल्या फैजान अन्सारीने पूनम पांडे आणि तिचा पती सॅमविरोधात कानपूर पोलिसांना अर्ज दिला आहे. मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे. तो म्हणाला की पूनमची ही कृती खुप व्यथित करणारी होती. प्रसिद्धीसाठी पूनमने हा मृत्यूचा बनाव रचला असून हे चुकीचं आहे. पूनमने पश्चात्ताप करून चिल्ड्रन कॅन्सर हॉस्पिटलला 2 कोटी रुपये दान करावे, अन्यथा पूनमवर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करू, असेही फैजानने म्हटले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पूनमच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

    ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने ही केली तक्रार

    ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पुनमविरोधात तक्रार केली होती. त्यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हण्टलं की,  “मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा बनावट पीआर स्टंट अत्यंत चुकीचा आहे. तुमच्या प्रसिद्धीसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे कारण वापरणं योग्य नाही. या बातमीनंतर, भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणत्याही मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवण्यास तयार होणार नाही. चित्रपटसृष्टीतील कोणीही पीआरसाठी इतकी खालची पातळी ओलांडत नाही. पूनम पांडेच्या मॅनेजरने खोट्या बातमीची पुष्टी केली होती, त्यामुळे पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरवर वैयक्तिक फायद्यासाठी (PR) तिच्या मृत्यूच्या बातमीचा गैरफायदा घेण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात यावी,असी मागणी करण्यात आली होती.