medhatai patkar in kon honar crore pati

ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर(Medha Patkar In Kon Honar crorepati) आणि समाजसेवक मतीन भोसले हे १८ सप्टेंबरच्या ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati)कर्मवीर विशेष भागात येणार आहेत.

    सामान्य माणसासाठी सतत झटणाऱ्या आणि त्यांचा आवाज बनणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर(Medha Patkar In Kon Honar crorepati) आणि समाजसेवक मतीन भोसले हे १८ सप्टेंबरच्या ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) कर्मवीर विशेष भागात येणार आहेत. मागील बऱ्याच वर्षांपासून मेधाताई सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष करत आहेत. सामान्य माणसांचा आवाज म्हणून काम करत आहेत. कर्मवीर विशेष या भागात ‘कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर येऊन त्या हा ज्ञानाचा खेळणार आहेत.

    यावेळी त्यांनी आतापर्यंत आलेल्या अनुभवांसोबतच समाजकार्य करतानाच्या काही आठवणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’चा कर्मवीर विशेष हा भाग या पर्वातला शेवटचा भाग असून, २० सप्टेंबरपासून सोमवार ते गुरुवार असे चार दिवस प्रेक्षकांची लाडकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.