sohail khan and seema khan

तब्बल २४ वर्षानंतर सोहेल खान (Sohail Khan Divorce) आणि सीमा या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानच्या (Salman Khan) कुटुंबातला हा दुसरा घटस्फोट आहे. याआधी अरबाझ आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे.

    सलमान खानचा (Salman Khan) भाऊ सोहेल खान(Sohail Khan Divorce) घटस्फोट घेत असल्याची बातमी आली आहे. सोहेलची पत्नी सीमा खान हीने कोर्टात नुकताच घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.सोहेलने १९९८ मधे सीमाशी लग्न केले होते. मात्र २४ वर्षांच्या सुखी संसारानंतर आता त्यांच्या घटस्फोटाची बातमी पुढे येत आहे. क्वचितच स्पॉट केल्या जाणाऱ्या या जोडप्याने त्यांच्या घटस्फोटाची ऑफिशिअल घोषणा अजून केली नसली तरी दोघे काल कोर्टाबाहेर दिसले होते. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. या दोघांना ‘निर्वान खान’ आणि ‘योहान खान’ अशी दोन मुले आहेत. त्यापैकी त्यांचा दुसऱ्या मुलाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.

    सोहेल आणि सीमा काही दिवसांपासून वेगळे राहत असल्याची चर्चा होती.फॅमिली कोर्टामध्ये ते घटस्फोटाची केस फाईल करायला गेले असल्याची माहिती मिळाली आहे. सोहेल आणि सीमाच्या लग्नाला सीमाच्या कुटुंबियांची सहमती नव्हती.या जोडप्याने लपून त्यांच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केले होते.लग्नानंतर या जोडप्याला दोन मुलेही झाली.तब्बल २४ वर्षानंतर या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय का घेतला हे अजूनही उघड झालेले नाही.सलमान खानच्या कुटुंबातला हा दुसरा घटस्फोट आहे. याआधी अरबाझ आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे.