अभिनय विश्वातली ‘सोनपरी’, मराठीसह गाजवलीये हिंदी चित्रपटसृष्टी!

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आज त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या चाहत्यांसहीत मराठी हिंदी सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    मराठी चित्रपट आणि मालिकाच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांचा आज  ५० वा वाढदिवस आहे. ‘सोनपरी’ बनून अवघ्या चिमुकल्यांचं विश्व व्यापून टाकलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या अनेक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. मृणाल कुलकर्णी यांचा जन्म 21 जून 1971 रोजी पुण्यात झाला. मालिकांव्यतिरिक्त मृणाल अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्येही झळकल्या आहेत.

    १६ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण

    मृणाल कुलकर्णी यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ‘स्वामी’ या मराठी मालिकेतून पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे माधोराव यांच्या पत्नी रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती. लहानपणापासून अभिनय करत असूनही, मृणाल यांना अभिनयात फारसा रस नव्हता. सुरुवातीला त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्त्यावर लक्ष केंद्रित करायचे होते. दरम्यान, त्यांना सतत अभिनयाच्या ऑफर्स येत होत्या. त्यानंतर 1994मध्ये मृणाल यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

    काही गाजलेले चित्रपट आणि मालिका

    ‘श्रीकांत’, ‘द ग्रेट मराठा’, ‘द्रौपदी’, ‘हसरते’, ‘मीराबाई’, ‘टीचर’, ‘स्पर्श’ आणि ‘सोनपरी’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मृणाल यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ‘स्वामी’ या मराठी मालिकेतून पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे माधोराव यांच्या पत्नी रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती.