कुटुंबाच्या विरोधात जाऊन सिनेक्षत्रात आलेली कपूर कुटुंबातील पहिली मुलगी!

करिश्मा कपूर आज तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. तकरिश्मा चित्रपटसृष्टीतील कुटुंबाशी संबंधित आहे ज्यांचे जवळजवळ संपूर्ण कुटुंब चित्रपटांमध्ये सामील आहे. रणधीर कपूर आणि बबिता यांची मोठी मुलगी, राज कपूर यांची नात, पृथ्वीराज कपूर यांची नात असलेल्या करिष्मानं अभिनय क्षेत्रात स्व:ताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  करिश्मा कपूरचा जन्म 25 जून 1974 ला मुंबईत झाला. लोलो हे तीचं निकनेम.

   

  कुटुंबाचा विरोध पत्करून चित्रपटात काम करणारी कपूर कुटुंबातील पहिली मुलगी. वडील अभिनेता रणधीर कपूर आणि आई अभिनेत्री बबीता यांच्यापासून अभिनायाचं बाळकडू घेऊन ती या क्षेत्रात आली.
  करिश्मानं 1991 मध्ये प्रेम कैदी चित्रपटापासून तिनं सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
  ज्यामध्ये बऱ्याचशा रोमँटिक चित्रपटांचा समावेश आहे. राजा हिंदुस्तानी, फिजा, झुबेदा, सुहाग, हिरो नंबर 1, दिल तो पागल है, यांसारख्या चित्रपटांमधील तिचा सहज अभिनय अनेकांना वेड लावलं.
  अंदाज अपना अपना, साजन चले ससुराल, कुली नंबर १ यासारख्या रोमँटिक कॅामेडी चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.
  अभिनेता गोंविदा आणि करिश्माची जोडी 90 च्या दशकात लोकांची फेवरेट जोडी होती.

   

  सुरुवातीला तिचं नाव अभिनेता अजय देवगण सोबत जोडण्यात आलं होतं

   

  काही काळाने तिच नाव अभिषेक बच्चनसोबत जोडण्यात आलं. त्यांची एंगेजमेंट झाली मात्र, दोन्ही कुटुंबानी एकमेकांसमोर ठेवलेल्या काही अटींमुळे हो नातं तुटलं.