‘गदर’ चित्रपटातील आठवणींना उजाळा देत अमिषा पटेलने सांगितले असे काही…

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर' या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

  बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर’ या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुपरहिट ठरण्यासोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. हा चित्रपट १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या एका दृश्यात अभिनेता खूप रागावलेला दाखवण्यात आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

  हातपंप उखडून हिंदुस्थान जिंदाबादचा नारा देत ते शत्रूंचा सामना करतात. ज्या ठिकाणी सनी देओलने हातपंप उखडला होता. ते दृश्य उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील फ्रान्सिस कॉन्व्हेंट स्कूलचे आहे. अमिषा पटेलने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते त्या ठिकाणी उपस्थित असतात. जिथे सनी देओलने हातपंप उखडला. तिने या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सविस्तर सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ‘गदर 2’ हा चित्रपट तयार होत आहे. ज्यामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल पुन्हा एकदा दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, ‘गदर’च्या सिक्वेल चित्रपटाची कथा १९७१ मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धावर आधारित असेल. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.