अदा शर्मा नंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं मुंबईत घेतलं घर! 11 कोटीच्या फ्लॅटसाठी भरली ५५ लाखांची स्टॅंप ड्युटी

सोनाक्षीनं वांद्र्यातल्या महागड्या परिसरात हे घर खरेदी केलंय. समुद्राच्या किनाऱ्यावर असेलल्या या फ्लॅटची किंमत 11 कोटी असून सोनाक्षीने या घराचं रेजिस्ट्रेशन करताना तब्बल ५५ लाखांची स्टॅंप ड्युटी भरली आहे.

    यावर्षी सिनेजगतातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्वप्नांच घर खरेदी केलं. नुकतच, अभिनेत्री अदा शर्मा (Adah Shrama) दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा वांद्रे येथील फ्लॅट खरेदी (Sushant Singh Rajput Flat) केला आहे. अदा नंतर आता दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हाने मुंबईत घर विकत घेतलं आहे. सोनाक्षीनं वांद्र्यातल्या महागड्या परिसरात हे घर खरेदी केलंय. समुद्राच्या किनाऱ्यावर असेलल्या या फ्लॅटची किंमत 11 कोटी असून सोनाक्षीने या घराचं रेजिस्ट्रेशन करताना तब्बल ५५ लाखांची स्टॅंप ड्युटी भरली आहे.

    कुठं आहे सोनाक्षीचं घर

    सोनाक्षी सिन्हा हिनं वांद्रे पश्चिमेला शारदा ऑडिटोरियमच्या जवळ ४,२०० स्क्वेअरफुटाचा सी फेसिंग फ्लॅट घेतला आहे. आहे. हा फ्लॅट २६ व्या मजल्यावर आहे. या घराचा व्यवहार ११ कोटींमध्ये झाल्याची माहिती आहे. घराचं रेजिस्ट्रेशनही नुकतंच झाल्याचं समोर आलं

    सोनाक्षीबद्दल बोलायचं झालं तर, नुकतंच ओटीटीमध्ये पदार्पण केलं असून काही महिन्यापुर्वी  अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘दहाड’ या वेबसिरीज रिलीज झाली होती. या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वेबसिरीजमध्ये सोनाक्षी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती.

    ‘या’ कलाकारांनीही खरेदी केली मालमत्ता

    अमिताभ बच्चन यांनी ज्या टॉवरमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. त्याच टॉवरमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी ऑफिसची जागा खरेदी केली आहे. अजय देवगण आणि काजोलने यावर्षी याच प्रोजेक्टमध्ये काजोलने त्याच टॉवरमध्ये 7.64 कोटी रुपयांना ऑफिस खरेदी केले होते, असे इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

    कार्तिक आर्यनने 10 कोटी रुपयांमध्ये 2100 स्क्वेअर फूट ऑफिसची जागा घेतली. तर, सारा अली खान आणि अमृता सिंग यांनी मिळून एक ऑफिस 9 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अमिताभ बच्चन यांचे ऑफिस २१ व्या मजल्यावर आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचे युनिट चौथ्या मजल्यावर आहेत.