राजेशाही थाटात राहणाऱ्या वेश्यांच्या तितक्याच अगणित व्यथा, संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’चा दमदार ट्रेलर रिलीज!

संजय लीला भन्साळी यांची 'हिरमंडी: द डायमंड बझार' ही या वर्षातील बहुप्रतिक्षित वेब-सीरीजपैकी एक आहे.

  संजय लीला भन्साळी (Samjay Leela Bhansali) हे उत्कृष्ट कलाकार आणि कथांसह भव्यता असलेले चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ओटीटी विश्वात पाहून ठेवलं असून त्यांची आणखी एक भव्य कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या हीरामंडी या बहुप्रतिक्षित वेब सिरिजचा ट्रेलर अखेर (Heeramandi Trailer ) रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर आपल्याला अशा काळात घेऊन जातो जेव्हा वेश्या राणी  म्हणून राज्य करत असत. 1940 च्या दशकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अशांत पार्श्वभूमीवर मांडलेल्या वेश्या आणि त्यांच्या ग्राहकांच्या कथांमधून हीरा मंडी या नामांकित क्षेत्राचे वास्तव दाखवण्यात आलं आहे.

  हिरामंडीचा ट्रेलर रिलीज

  ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘राजवाड्याच्या चकचकीत, भव्य हॉलच्या शांततेत प्रणय आणि क्रांतीची टक्कर होते. संजय लीला भन्साळी यांची प्रेम, तोटा आणि सुटका यांची व्यापक गाथा – हीरामंडी: द डायमंड बाजार.’ मालिका प्रेक्षकांना समृद्ध, उत्कटता आणि अतुलनीय कथाकथनाच्या जगात घेऊन जाते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Netflix India (@netflix_in)

  कलाकारांची फौज

  या वेबसिरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख यांच्या मुख्य भुमिका आहेत. नवाबांना आपल्या ताब्यात ठेवण्यापासून ते ब्रिटीशांच्या दडपशाहीविरुद्ध लढण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. फरदीन खान, ताहा शाह बदुशा, शेखर सुमन आणि अध्यायन सुमन नवाबांच्या भूमिकेत आहेत.

  संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ओटीटी पदार्पणाबद्दल बोलताना सांगितले होते की, ‘मी मोठे चित्रपट बनवतो आणि ते माझ्यासाठी स्वाभाविक आहे, पण जेव्हा मी ओटीटीमध्ये आलो तेव्हा मी काहीतरी मोठे केले. हा माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प आहे, म्हणून मी तो केला.  ही केवळ मालिका नाही तर एक जग आहे आणि मी जगभरातील प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवरील ‘हीरामंडी’च्या जगात घेऊन जाण्यास तयार आहे. मी त्याची वाट पाहत आहे. या मालिकेची निर्मिती मोईन बेग यांनी केली असून त्याला संजय लीला भन्साळी आणि प्रेरणा सिंग यांचे समर्थन आहे. ‘हिरामंडी: द डायमंड बझार’ 1 मे पासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.