sonali bendre

लोकलने प्रवास करताना काय काळजी घ्यावी हे सगळ्या वयोगटातील महिलांना चांगले ठाऊक असते. सुरक्षित प्रवासासाठी आणखी काय करावे, याची माहिती देण्यासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

    अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने (Mumbai Local) प्रवास करायची. सोनालीच्या आईने लोकल प्रवास करतेवेळी काय काळजी घ्यायची याच्या काही सूचना तिला दिल्या होत्या. महिलांच्या डब्यातून प्रवास करणे, अंधार पडल्यानंतर एकटीने प्रवास करू नये अशा अनेक गोष्टी महिला, लोकल ट्रेनने प्रवास करताना ध्यानात ठेवत असतात. पण महिलांच्या प्रवासाचा विषय सोनालीने काढण्याचं एक खास कारण आहे.

    ‘खाकी मे सखी’ उपक्रम आहे तरी काय?
    लोकलने प्रवास करताना काय काळजी घ्यावी हे सगळ्या वयोगटातील महिलांना चांगले ठाऊक असते. सुरक्षित प्रवासासाठी आणखी काय करावे, याची माहिती देण्यासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘खाकी मे सखी’ (Khaki Mein Sakhi)असं या उपक्रमाचं नाव असून सोनाली बेंद्रेने या उपक्रमाची ओळख करून दिली आहे. हा उपक्रम मुंबई रेल्वे पोलीस आणि ‘कोटो’ या सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्मने संयुक्तरित्या राबवण्याचं ठरवलं आहे. खाकी वर्दीतील महिला पोलीस या आपल्या सखीप्रमाणे असून संकटसमयी, अडचणीच्या प्रसंगी आपण त्यांना मदतीसाठी हाक मारू शकतो, ही संकल्पना रुजवण्याचा या उपक्रमामार्फत प्रयत्न केला जात आहे.

    कोटो कम्युनिटी ‘खाकी मे सखी’ हा एक ऑनलाईन मंच असून यावर महिला आपली मते, आपल्या चिंता, समस्या खुलेपणामे मांडू शकतात. अवेळी प्रवास करताना वाटणारी भीती, लैंगिंक छळ, पुरुषांच्या डब्यातून प्रवास करताना इतरांमुळे वाटणारा संकोच यासारख्या समस्या महिला प्रवासी या मंचाद्वारे मांडू शकतात.