सर्वोत्तम फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचं मुंबईत जोरदार आदिरातिथ्य; सोनम कपूर, शाहरुख खानकडून पार्टीचं आयोजन!

सोनम कपूरने डेव्हिड बेकहॅम खास पार्टीचं आयोजन केलं होतं तर, किंग खान शाहरुखनेही बेकहॅम घरी बोलंवत त्याच्यासाठी पार्टी ठेवली. यावेळी सेलिंब्रिटींक़डून या विदेशी पाहुण्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

  जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनओळख जाणार इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम  (David Beckham) सध्या भारत दौऱ्यावर आहे.  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना पाहण्यासाठीही बेकहमनं हजेरी लावली होती. त्यानंतर बॅालिवूड सेलेब्रिटीसह उदोगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरीही बेकहॅमनं हजेरी लावली. सोनम कपूरने (Sonam Kapoor) डेव्हिड बेकहॅम खास पार्टीचं आयोजन केलं होतं तर, किंग खान शाहरुखनेही (Shah rukh Khan) बेकहॅम घरी बोलंवत त्याच्यासाठी पार्टी ठेवली.  यावेळी सेलिंब्रिटीकडून या विदेशी पाहुण्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

  सोनम कपूरकडून खास पार्टीचं आयोजन

  भारताच्या दौऱ्यावर असलेल्या डेविड बेकहमसाठी अभिनेत्री बुधवारी रात्री अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी  एक पार्टीचं आयोजन केलं होतं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा सामना पाहिल्यानंतर डेव्हिड बेकहॅमने सोनम कपूरच्या पार्टीला हजेरी लावली होती.  यावेळी अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींही उपस्थित होते. यावेळी अनेक सेलेब्रिटिंनी डेव्हिड बेकहॅमची भेट घेतली. त्यानंतर, डेविड बेकहमला अंबानी कुंटुंबियाकडून आमंत्रण आलं.  अंबानी कुटुंबीयानंही त्याचं आदिरतिथ्य करत त्याला  7 नंबर असलेली मुंबई इंडियन्सची जर्सी भेट म्हणून दिली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)

  शाहरुख खानकडूनही पार्टीचा आयोजन

  फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसाठी शाहरुख खाननं मन्नत बंगल्यात खास पार्टीचं आयोजन केलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मन्नत बंगल्याच्या बाहेर एक आलिशान कार येऊन उभी राहते. कारच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला डेव्हिड बेकहॅम बसल्याचं दिसत आहे.