कोरोना येताच सोनू सूद पुन्हा अॅक्शन मोडमध्ये; ट्वीट करत दिली ‘ही’ माहिती

2020 च्या लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद मुंबई आणि भारतातील इतर शहरांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी आशेचा किरण बनला होता. सोनूच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांना त्यांच्या गावी सुखरूप नेण्यात यश आले. 2021 मध्येही, सोनू आणि त्याच्या टीमनं मुंबईतील गरजू लोकांना मदत करणे सुरूच ठेवले होते.

    मुंबई : कोरोना महामारीचे दूर गेलेले संकट आता पुन्हा डोकं वर काढू लागले आहे. चीन मध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागल्यामुळे भारतातही कोरोना पुन्हा बळावणार असल्याची शक्यता आहे. तेव्हा भारताकडूनही याबाबत सतर्क भूमिका घेण्यात येत असून पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच कोरोनाकाळात गरीब आणि सामान्य जनतेचा देवदूत म्हणून समोर आलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नुकतंच एक सूचक ट्वीट केले आहे.

    सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही ट्वीट करत लिहिले, ‘कोरोनापासून सावध राहा, घाबरू नका, देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. नंबर एकच आहे’. सोनूनं फक्त ट्वीट करत ही माहिती दिली नाही तर त्यानं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उघड केलं की अलीकडेच त्यांची स्वयंसेवक आणि टीमच्या काही सदस्यांसोबत एक मीटिंग घेतली जेणेकरून ते गरजूंची सेवा करण्यास तयार राहतील. कारण जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्यांच्याकडे सगळे प्लॅन्स हे तयार राहतील.

    सोनूनं खुलासा केला की, ‘गेल्या काही दिवसांत आम्ही आमच्या स्वयंसेवकांच्या आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या सर्व लोकांसोबत वेगवेगळ्या भागात आणि गावांमध्ये मीटिंग घेतल्या. गरज पडल्यास आम्ही त्यांना काहीही करण्यास तयार राहण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत. मग ती औषधे असोत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असोत किंवा इतर काही आवश्यक गोष्टी. आपण जास्तीत जास्त लोकांना मदत केली पाहिजे. जो कोणी आमच्यापर्यंत पोहोचेल तो कोणताही कॉल खाली जाणाक नाही याची आम्ही काळजी घेऊ, आमच्या बाजूने जे शक्य आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

    2020 च्या लॉकडाऊन दरम्यान सोनू सूद मुंबई आणि भारतातील इतर शहरांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी आशेचा किरण बनला होता. सोनूच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांना त्यांच्या गावी सुखरूप नेण्यात यश आले. 2021 मध्येही, सोनू आणि त्याच्या टीमनं मुंबईतील गरजू लोकांना मदत करणे सुरूच ठेवले होते.