sonu sood

सोनू सूदने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन राजकीय पक्षांकडून मला राज्यसभेची ऑफर(Rajyasabha Offer To Sonu Sood) होती. मात्र मी ती स्वीकारली नाही.

    अभिनेता सोनू सूदच्या(Sonu Sood) सहा ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यानंतर आयकर विभागाला सोनू सूदने २० कोटी रुपयांचा कर बुडवल्याचे(20 Crore Tax Evaded By Sonu Sood) पुरावे मिळाले आहेत. आयकर विभागाने याबाबत अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलं. त्यानंतर सोनू सूदने सोशल मीडियावर माझं काम सुरुच राहील अशा आशयाची पोस्ट केली होती. आता सोनू सूदने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोन राजकीय पक्षांकडून मला राज्यसभेची ऑफर(Rajyasabha Offer To Sonu Sood) होती. मात्र मी ती स्वीकारली नाही. मी कधीही काही चुकीचे केले नाही, असे सोनू सूदने म्हटले आहे.

    यापुर्वीच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सोनूने पुढे लिहिले आहे की, ‘‘मी काही पाहुण्यांचे स्वागत करण्यात व्यस्त होतो. त्यामुळे गेले ४ दिवस तुमची सेवा करु शकलो नाही. आता मी पुन्हा एकदा विनम्रतापूर्वक आयुष्यभर तुमच्या सेवेत परत आलो आहे. चांगले करा, चांगलेच होईल, शेवटही चांगला होईल. माझा प्रवास चालू राहील. जय हिंद.’’

    या पोस्टनंतर त्याने आता राजकारणातून आलेल्या ऑफरवर भाष्य केले आहे. दोन पक्षांकडून आलेली राज्यसभेची ऑफर नाकारली असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आयकर विभाग सोनूवर काय कारवाई करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय दबाव आणण्यासाठी सोनूला अडचणीत तर आणले जात नाही ना ? असा सवाल सोनूच्या चाहत्यांना पडला आहे.