दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी Personality Of The Year पुरस्काराने सन्मानीत!

त्यांनी सिनेकारकिर्दीत जवळपास 150 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व (Personality Of The Year)हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं.

    पणजी : 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) रविवारी गोव्यात थाटात सुरुवात झाली. (IFFI 2022 Inaugurated in Goa). या या पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचा पुरस्काराने (Personality Of The Year) सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ लेखक विजयेंद्र प्रसाद, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, अभिनेते अजय देवगण, सुनील शेट्टी आणि मनोज बाजपेयी यांच्यासह चित्रपट उद्योगातील अनेक सदस्यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.

    अभिनेता चिरंजीवी यांचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नव्हे देशात चांगलाच चाहतावर्ग आहे.  आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. त्यांनी सिनेकारकिर्दीत जवळपास 150 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व (Personality Of The Year)हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं.

    यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत चिरंजीवी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनेता, डान्सर आणि निर्माता म्हणून चिरंजीवी यांनी 150 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. गेली चार दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. चिरंजीवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे…खूप खूप अभिनंदन”

    चिरंजीवी यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द

    चिरंजीवी यांनी 1978 साली त्यांनी ‘पुनाधिरल्लू’ या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी अनेक दाक्षिणात्य सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आजवर त्यांना 10 फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.