स्पाइस जेटने केलं सोनूचं कौतुक, सोनूची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!

स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केलं आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर सोनूचा फोटो लावण्यात आला आहे.

  कोरोना आणि पर्यायाने आलेल्या लॉकडाऊनमुळे सुनू सुद चर्चेत आलाय. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवलं. तसंच इतर गरजूंच्या मदतीलाही तो सातत्याने धावून जाताना दिसत आहे. यामुळेच भारतातील अनेक लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील हीरो झालाय. त्याच्या या कामाची दखल स्पाइस जेट या विमान कंपनीने घेतली आहे.

   

  स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केलं आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर सोनूचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोसोबतच स्पाइस जेटने सोनूसाठी “देवदूत सोनू सूदला वंदन” अशा आशयाची ओळ त्यांनी लिहिली आहे. हा फोटो शेअर करताना सोनूही ट्विटरवर भावूक झाला आहे. त्याने स्पाइस जेटच्या त्या विमानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

   

  सोनू म्हणाला..

  “विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई पर्यंत केलेला प्रवासाची आठवण झाली. आज मला माझ्या आई-वडीलांची खूप आठवण येत आहे.” अशा आशयाचे कॅप्शन त्याने फोटोंना शेअर करत दिले आहे. सोनूच्या या ट्विटची चर्चा सर्वत्र सुरू आहे.