
‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ (Spider Man No Way Home) शुक्रवारी रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ४१.५० कोटींची (Spider Man No Way Home First Day Collection) कमाई केली आहे.
मार्वल स्टुडिओजची सीरिज स्पायडर मॅनचा तिसरा भाग ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ (Spider Man No Way Home) शुक्रवारी रिलीज झाला आहे. हा चित्रपट भारतात इतर देशांच्या एक दिवस आधी म्हणजेच १६ डिसेंबरला रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ४१.५० कोटींची (Spider Man No Way Home First Day Collection) कमाई केली आहे. या चित्रपटाने अक्षय कुमारच्या सूर्यवंशीचाही रेकॉर्ड मोडला आहे. सूर्यवंशीचे ओपनिंग कलेक्शन २६.२९ कोटी होते.
खरंतर ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ भारतात चित्रपटगृहात पन्नास टक्के क्षमतेच्या अटीसह रिलीज केला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार ३२६४ स्क्रीनवर ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ प्रदर्शित झाला. ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ हा २०२१ मध्ये भारतात सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा हॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. भारतात रिलीज होण्यापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ ला १८ कोटी मिळाले होते. ‘स्पायडर मॅन: नो वे होम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन वॉटसनने केलं आहे. या चित्रपटात टॉम हॉलंडने स्पायडर-मॅनची भूमिका साकारली आहे.