Uma Pendharkar

सुमन एन्टरटेन्मेंट(Suman Entertainment) आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘श्री सुक्तम’ (Sri Suktam Video)हा मंगलमय मंत्र (Devi Mantra Video) व्हिडिओ रूपात भक्तांच्या भेटीला आला आहे.

    लवकरच सगळीकडे देवीचं(Navratri 2021) आगमन होणार असून, तिच्या आगमनानं चैतन्यमय झालेलं वातावरण मंत्रोच्चारांनी अधिकच उत्साहवर्धक होणार आहे. मंत्रोच्चारानं मन प्रसन्न होतं. सुमन एन्टरटेन्मेंट(Suman Entertainment) आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘श्री सुक्तम’ (Sri Suktam Video)हा मंगलमय मंत्र (Devi Mantra Video) व्हिडिओ रूपात भक्तांच्या भेटीला आला आहे.

    विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ‘श्री सुक्तम’ हा मंत्र म्हणत देवीची उपासना करताना दिसत आहे. या मंत्राचं वैशिष्टय म्हणजे एरव्ही देवीचा फोटो आणि बाजूला मंत्र सुरू असतो, मात्र या मंत्राला एखाद्या गाण्यासारखे व्हिज्युअल्स देण्यात आले आहेत. अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या मंत्राचे निर्माता केदार जोशी असून, दिग्दर्शक संकेत सावंत आहेत. भारतीय पुराणात मंत्र परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे.

    ‘श्री सुक्तम’ या मंत्राला चिनार-महेश यांनी संगीत दिलं असून, आनंदी जोशीचा सुमधूर आवाज लाभला आहे. मंत्रांचं उच्चारण केल्यानं तयार होणाऱ्या ध्वनी लहरींमुळं आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.