पुढचे ७ जन्म हीच बायको मिळावी म्हणून ‘हा’ अभिनेता घालणार वडाला फेरे!

अनन्याची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे आणि अनन्याबरोबर अथर्वही तिच्यासाठी वडाला फेऱ्या घालून वटपौर्णिमेची पूजा करतो

    वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी अगदी खास सण, येत्या काही भागांमध्ये सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘आई माझी काळुबाई’ आणि ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकांमध्ये प्रेक्षकांना वटपौर्णिमा पाहायला मिळणार आहे.

    अनन्याची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे आणि अनन्याबरोबर अथर्वही तिच्यासाठी वडाला फेऱ्या घालून वटपौर्णिमेची पूजा करतो आणि पुढचे ७ जन्म हीच बायको मिळावी अशी इच्छा व्यक्त करतो. पण ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत मात्र याच जन्मात आपण एक होणार नाही, तर पुढल्या जन्मांसाठी पूजा का करायची, असं म्हणून सूर्यभान ऐश्वर्याला वटपौर्णिमा करण्यास साफ नकार देतो.

    ‘आई माझी काळुबाई’ मालिकेत अमोघचे प्राण संकटात असून आर्या आपल्या पतीचे प्राण सावित्रीप्रमाणेच वाचवू शकेल का, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    वटपौर्णिमा विशेष भाग हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहेत.