yogyogeshwar serial

कलर्स मराठीवरील (Colors Marathi) ‘योगयोगेश्वर जय शंकर’(Yogyogeshwar Jai Shankar) मालिकेमध्ये रक्षाबंधन विशेष भागांमध्ये एक विशेष एंट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा हे पात्र साकारणारी, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील स्पर्धक ‘सृष्टी पगारे’ मालिकेत पावनीची भूमिका साकारणार आहे.

    श्रावण महिन्यामध्ये अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी असतात. त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो . याच बरोबर येते संततीरक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही खास आहे. लवकरच कलर्स मराठीवरील (Colors Marathi) ‘योगयोगेश्वर जय शंकर’ (yogyogeshwar jai shankar) मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग (rakshabandhan special episodes) बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे.

    या विशेष भागांमध्ये मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा हे पात्र साकारणारी, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातील स्पर्धक ‘सृष्टी पगारे’ (Srushti pagare) मालिकेत पावनीची भूमिका साकारणार आहे.

    मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्यांची मुलगी पावनी हिचा विश्वास आहे की तिचा भाऊ परत येईल. तिला तसे भास होत आहेत. तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का ? बाळ शंकर तिची मदत कशी करतील ? हे सगळे कलर्स मराठीवर ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

    याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, “मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळतं आहे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा”.