stone pelting on sushant shelars car

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक (Stone Pelting On Sushant Shelar Car) करण्यात आली आहे. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुशांतच्या गाडीवर हल्ला (Attack On Sushant shelar Car) केल्याचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये दिसत आहे.

    मुंबई: अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक (Stone Pelting On Sushant Shelar Car) तसेच त्याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुशांतच्या गाडीवर हल्ला (Attack On Sushant shelar Car) केल्याचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये दिसत आहे.

    याबाबत सुशांत म्हणाला की, “मध्यरात्री २ च्या दरम्यान एका अज्ञाताने हल्ला करून गाडीची काच फोडली. त्याने असं का केलं हे तर मला माहीत नाही, पण मी याप्रकरणी  तक्रार दाखल करेन.”

    याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.