story time with sudha murty

‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ द्वारे लहान मुलांना  ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ मध्ये लहान मुलांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्यांना अनेक गोष्टी शिकताही येतात.

    मुंबई: मूर्ती मीडिया या कंटेट प्रोडक्शन हाऊसने तयार केलेल्या ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ (Story Time With Sudha Amma) या ॲनिमेटेड सीरिजचं नुकतंच लाँचिंग करण्यात आलं. ही सीरिज एका युट्युब चॅनेलवर प्रसारीत केली जाणार आहे. या कार्यक्रमाला आबालवुद्धांना आवडतील अशा सुंदर गोष्टी रचणाऱ्या, प्रसिद्ध लेखिका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुधा मूर्ती, या सीरिजसाठी ॲनिमेशनची निर्मिती करणाऱ्या ‘कॉसमॉस माया’च्या सीईओ मेघा टाटा, गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार शांतनू मोईत्रा यांनी उपस्थिती लावली होती.

    शिक्षणासोबतच मुलांची करमणूकही व्हावी हा मूर्ती मीडियाचा प्रयत्न आहे. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ द्वारे लहान मुलांना  ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ मध्ये लहान मुलांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्यांना अनेक गोष्टी शिकताही येतात. गीतकार प्रसून जोशी आणि संगीतकार शांतनू मोईत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’च्या थीम साँगचे सीरिज लाँचिंगच्या कार्यक्रमात सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात, सुधा मूर्ती यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना सांगताना गोष्टी सांगण्याचे कसब किती महत्त्वाचे आहे आणि दुर्गम भागातील लहान मुलांनादेखील या गोष्टी पोहचवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.

    सुधा मूर्ती यावेळी म्हणाल्या की,“गोष्टी सांगणे ही एक कला आहे, ज्यामुळे लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही ती लक्ष देऊन ऐकतात. ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ ही अपर्णा कृष्णन यांची कल्पना आहे. मूर्ती मीडियाने गोष्टी ॲमिनेशनच्या माध्यमातून जिवंत करण्याचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. अपर्णा यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत असून माझ्या कथा मीच पाहणे यासारखा दुसरा आनंद नाही. कथांमधली पात्र डोळ्यासमोर जिवंत होत असलेली पाहून मला फार छान वाटतंय.”

    मूर्ती मीडियाच्या अध्यक्षा अपर्णा कृष्णन यांनी यावेळी बोलताना म्हटले की, “मूर्ती मीडियाशी निगडीत आम्हा सर्वांसाठी आजचा दिवस हा खरंच खूप मोठा दिवस आहे. आम्ही नुकतेच एक युट्युब चॅनेल सुरू केले असून याचा उद्देश हा प्रेक्षकांना आवडेल असा, माहितीपूर्ण आणि स्वदेशी कंटेंट निर्माण करणे हा आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध होणारे व्हिडिओ काहीतरी शिकवणारे, आनंद देणारे, प्रेरणादायी आणि ज्ञानाचे बीज पेरणारे आहेत. लहान मुलांवर सकारात्मक परिणाम होण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरतील. ”