Vasant Vaibhav

वसंत कानेटकर हे लोकप्रिय नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि थोर विचारवंत होते. त्यांच्या अनेक नाटकांचे हजारोंपेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत.

    मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत (Directorate of Cultural Affairs of Maharashtra Government) नाटककार वसंत कानेटकर (Playwriter Vasant Kanetkar) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (Birth Centenary) त्यांच्या कला आणि कार्यावर आधारीत वसंत वैभव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ जुलै,२०२२ रोजी सायंकाळी ०७:३० वाजता शिवाजी मंदिर, दादर (Shivaji Mandir, Dadar, Mumbai) येथे करण्यात आले होते.

    वसंत कानेटकर हे लोकप्रिय नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि थोर विचारवंत होते. त्यांच्या अनेक नाटकांचे हजारोंपेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत.

    वसंत वैभव या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते आणि जानवी पणशीकर (प्रभाकर पणशीकर यांच्या कन्या) यांचे हस्ते वसंत कानेटकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात झाली. कार्यक्रमाची संकल्पना वैजयंती आपटे यांची असून, लेखन व दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे.

    या कार्यक्रमात चारुदत्त आफळे, अभय जबडे, नितीन कानेटकर, विजय काळे, अविनाश ओगले, राहुल गोळे, सिंध्दार्थ कुंभोजकर, राकेश घोलप, नरेंद्र वीर, गौरी पाटील, गौरी रत्नपारखे, चारुलता पाटणकर अशा दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.