प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथाची कविता सुदेश भोसले यांच्या आवाजात घुमणार

चित्ररथात महाराष्ट्राची  विविधता

    मुंबई : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाची कविता सुदेश भोसले (Sudesh Bhosle) यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. या चित्ररथात आपल्याला महाराष्ट्राची जैव विविधता बघायला मिळणार आहे. आणि ही  विविधता यंदा कवितेच्या मध्यमातून मांडण्यात आली आहे आणि खास बात म्हणजे ही  कविता सुदेश भोसले यांच्या भारदस्त आवाजात राजपथावर घुमणार  आहे.

    माझ्यासाठी  खूप अभिमानाची बाब-सुदेश भोसले 

    नेहमी आपल्या  चित्ररथात गड किल्ले,शिवाजी महाराज दाखवतात. पण यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या चित्ररथात आपली  जैव विविधता एका  कवितेच्या माध्यमातून दिसेल आणि या अनोख्या संकल्पनेतून  माझा आवाज लाखो देशवासीयाना ऐकायला मिळेल ही,  माझ्यासाठी  खूप अभिमानाची बाब आहे .