shahrukh and ananya

अनन्या पांडे(Ananya Panday) ही शाहरुखच्या कुटुंबाचा एक भाग आहे. (Suhana is best friend and shahrukh is father figure for ananya panday)एका मुलाखतीत अनन्या तिच्या आणि शाहरुखच्या बॉन्डिंगवर बोलली होती.

  अभिनेता चंकी पांडे(Chunky Panday) यांची मुलगी अनन्या पांडे(Ananya Panday) एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनन्या ही शाहरुख खानची लेक सुहानाची चांगली मैत्रीण आहे. अनन्या ही आर्यन आणि अबरामसोबत अनेकदा दिसली आहे. अनन्या ही शाहरुखच्या कुटुंबाचा जणू काही एक भाग आहे. एका मुलाखतीत अनन्या तिच्या आणि शाहरुखच्या बॉन्डिंगवर बोलली होती.(Suhana is best friend and shahrukh is father figure for ananya panday)

  “शाहरुख माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ते माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीचे वडील आहेत. आम्ही एकत्र आयपीएलचे सामने पाहण्यासाठी जायचो,” असे अनन्या बोलली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

  ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या प्रमोशवेळी अनन्या शाहरूखविषयी बोलली होती. “आम्ही मैत्रिणींनी एकत्र बऱ्याच विचित्र गोष्टी केल्या आहेत. शाहरुख सर, नेहमी आम्हाला प्रोत्साहीत करायचे आणि आमच्यासोबत फोटोशूट करायचे. ते आमचे व्हिडिओ काढून आम्ही किती चांगला अभिनय करतो याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करयाचे. त्यानंतर तो व्हिडिओ ते इतरांना दाखवायचे आणि म्हणायचे बघा या लोकांनी काय केलं आहे.”

  पुढे अनन्या बोलली, “फक्त सुहाना आणि शनायाचं तिच्या चित्रपटसृष्टीतील सगळ्यात चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो.” शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे.