लतिकाचा ‘वाथी कमिंग’ डान्स पाहिलात का? VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेतून सौंदर्य म्हणजे केवळ बारीक असणे किंवा ग्लॅमरस दिसणे असे नसते, तर सौंदर्य हे मनात असतं असा संदेश देण्यात येत आहे.

  सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार वाथी कमिंग या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील ‘लतिका’ने देखील हा ट्रेंड फॉलो केल्याचे दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अक्षया नाईकने लतिका ही भूमिका साकारली आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दौलत, आशू दादासोबत लतिका डान्स करताना दिसते. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेतून सौंदर्य म्हणजे केवळ बारीक असणे किंवा ग्लॅमरस दिसणे असे नसते, तर सौंदर्य हे मनात असतं असा संदेश देण्यात येत आहे. त्यामुळे ही मालिका सौंदर्याची परिभाषा खऱ्या अर्थाने उलगडत आहे. या मालिकेत अक्षया नाईक लतिकाची भूमिका साकारत आहे. जी इतर मूलींपेक्षा थोडी वेगळी आहे.