‘हेरा फेरी’ ला २१ वर्ष पुर्ण, सुनील शेट्टीने शेअर केली खास आठवण!

सुनील शेट्टीने या चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की,  ‘वेळ किती पटापट निघून जातो.

    ‘हेरा फेरी’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे मुख्य भूमिकेत आहेत. आजही हा चित्रपट चाहते आवडीने बघतात. ‘हेरा फेरी’ चित्रपटाला आज ३१ मार्च रोजी प्रदर्शित होऊन २१ वर्षपूर्ण झाल्यामुळे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

     

    सुनील शेट्टीने या चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने म्हटलं आहे की,  ‘वेळ किती पटापट निघून जातो. २१ वर्षे कधी उलटली कळलंही नाही. गुलशन ग्रोवर, परेश रावल सर, अक्षय कुमार, प्रियदर्शन आपण मस्त चित्रपट तयार केला होता. आज मला दिवंगत अभिनेते ओम पूरी यांची आठवण येत आहे’ असे कॅप्शन दिले आहे.

    अक्षयने सुनीलच्या या ट्वीटला रिट्वीट केले आहे. ‘मी तुझ्याशी सहमत आहे. त्यावेळी आम्हाला माहिती देखील नव्हते आपण इतक्या चांगल्या चित्रपटात काम करत आहोत. प्रत्येक सीन आणखी कसा चांगला होईल याकडे आपले लक्ष होते’ असे तो म्हणाला.